Kirit Somaiyya : Ajit Pawar तुरुंगात जाणार हा शब्दप्रयोग, 'त्या' वक्तव्यावरून सोमय्यांचा यु-टर्न?
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 08:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirit Somaiyya on Ajit Pawar : भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा वारंवार इशारा देणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी तुरुंगाच्या भाषेवर यु-टर्न घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणे. सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही. असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अक्षरशः यु टर्न घेतला. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सोमय्या यांना विचारण्यात आला. तेव्हा तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहा असे म्हणत तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा, असे उलट आवाहन त्यांनी केले.