Kirit Somaiya FULL : आधी आरोप, आता कागदपत्र; किरीट सोमय्या यांचा किशोरी पेडणेकरांवर घणाघात ABP Majha

Kirit Somaiya VS Kishori Pednekar : भाजप नेते किरीट सोमय्यांनी ( Kirit Somaiya ) पत्रकार परिषद घेत माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ एक प्रकरण नाही, तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा दादर पोलिसांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सोमय्यांनी कागदपत्रं जमा केली. पेडणेकर यांनी कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांनी या विषयावर प्रसारमाध्यमांशी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola