Kirit Somaiya on uddhav Thackeray : 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत?
अलिबागमधील कोर्लई येथील ठाकरे आणि वायकर कुटूंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.