kirit Somaiya : दिवाळीनंतर फटाके फोडणार, किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडीला इशारा
Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा दिलाय. दिवाळीनंतर फटाके फोडणार असं ट्विट करत सोमय्यांनी सूचक इशारा दिलाय. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात आघाडी उघडलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य काही नेत्यांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे कागदपत्रेही सादर केलीत..
Continues below advertisement