ABP News

Kirit Somaiya Kishor Pednekar : गप्पा, चर्चा आणि हास्य, किरीट सोमय्या - किशोरी पेडणेकर समोरासमोर

Continues below advertisement

आपण आत्तापर्यंत किरीट सोमय्यांना ठाकरे गटावर आगपाखड करताना पाहिलंय... आणि त्याला उत्तर देताना आक्रमक झालेल्या किशोरी पेडणेकरांनाही पाहिलंय... पण आता जी दृश्य तुम्ही पाहणार आहात.. ती पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही... याचं कारण टीव्ही चॅनेलवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे अक्षरशः एकमेकांसमोर येताच हसत... हात मिळवताना दिसतायत... एका लग्न सोहळ्यात किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या उपस्थित होते... किशोरी पेडणेकरांना पाहताच किरीट सोमय्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला... आणि किशोरी पेडणेकरांनीही त्यांना हस्तांदोलन केलं... 
यावेळी संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊतही उपस्थित होते...  राजकारण एकीकडे आणि वैयक्तिक संबंध एकीकडे अशीच ही दृश्य आहेत... महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही दृश्य आहे...  त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आरोप-प्रत्यारोप होत असताना ही दृश्य लक्षात ठेवावी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram