Kirit Somaiya Enquiry : किरीट सोमय्यांना आजपासून सलग 4 दिवस आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार
Continues below advertisement
आता बातमी आहे किरीट सोमय्यांसंदर्भातली...कथित विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांची आजपासून सलग चार दिवस चौकशी होणार आहे... आर्थिक गुन्हे शाखेकडून ही चौकशी होणार असून त्यासाठी आजपासून पुढील ४ दिवस सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावं लागणार आहे... सोमय्यांनी कोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जमीन अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिलाय मात्र त्याचवेळी विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत..
Continues below advertisement