Cruise Drugs : Kiran Gosaviचा पोलिसांशी कोणताही संपर्क साधला, Pune पोलीस सहाय्यक आयुक्तांची माहिती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party )शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात एनसीबीने (NCB) साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) विरोधात एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर होते परंतु गेल्या अनेक दिवसांपासून किरण हा बेपत्ता होता. त्यानंतर आज ABP माझाशी बोलताना त्याने तो उत्तरप्रदेश च्या लखनऊ येथे शरण येणार असल्याचे सांगितले आहे. परंतु पुणे पोलिसांशी किरणने अजून कोणताही संपर्क साधला नसल्याचं पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितलं . पुणे पोलिसांची दोन पथकं राज्याबाहेर किरणचा शोध घेत असल्याची ही त्यांनी माहिती दिली आहे.