Parambir Singh :परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, किल्ला कोर्टाकडूनही त्यांच्या नावाने वॉरंट जारी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता कमालीची वाढ होणारे असल्याची चिन्ह आहेत. एकीकडे परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी आता राज्य सरकारनं केली असून काहीच दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांचा पगार थांबवल्याची माहिती आली होती. आता या अडचणीत अजुन भर पडण्याची शक्यता आहे. ठाणेपाठोपाठ आता मुंबईच्या किल्ला कोर्टाकडून ही परमबीर सिंह यांच्या नावाने वॉरंट जारी केलं आहे. परमबीर सिंहांविरोधात व्यापारी विमल अग्रवाल यांची खंडणीची तक्रार केली असून वारंवार समन्स पाठवूनही हजर न राहिल्यानं कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Tags :
Mumbai Court Maharshtra Government Absconded Parambir Singh Killa Court Non Bailable Warrant Against Parambir Singh Parambir Singh Extortion Vimal Agarwal