COVID-19 Report | कोरोना रिपोर्टमध्ये फेरफार; रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही मुंबईहून जयपूरला जाण्याचा तिघांचा प्रयत्न

कोविड पॉझिटीव्ह रिपोर्टमध्ये फेरफार करुन रिपोर्ट निगेटीव्ह भासवण्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आलाय. खारमधील एकाच कुटुंबातील 3 कोविड पॉझिटीव्ह व्यक्तींनी रिपोर्टमध्ये फेरफार करुन विमान प्रवासासाठी निगेटीव्ह रिपोर्ट दाखवला. संबंधित  कुटुंब मुंबईतील खारमध्ये वास्तव्यास आहे, या कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र तरीही या तिघांनी मुंबईहून जयपूरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपल्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये फेरफार करत तो निगेटिव्ह दाखवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola