Sachin Vaze | सचिन वझे यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, पण सरकार पाठिशी घालतंय : देवेंद्र फडणवीस
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव विरोधकांनी उपस्थित केलं. तसंच त्यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशयही विरोधकांनी व्यक्त केला. परंतु सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली.