Kalyan Dombivali : केडीएमटी प्रशासनाचा भोंगळ कारभार, परिवहन कर्मचाऱ्यांना चेंजिंग रम नाही
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना चेंजिग रुम नसल्याचं बाब समोर येतीय.. परिणामी या कर्मचाऱ्यांना बंद पडलेल्या बसेसमध्ये चेंज करावं लागंत. कल्याण- डोंबिवलीच्या रस्त्यावर केडीएमसी परिवहनच्या सुमारे 60 ते 70 बस धावतात. तर या परिवहनमध्ये जवळपास 550 चालक आणि वाहक कर्मचारी काम करतात. परंतु या वाहन चालक आणि वाहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय.. एकीकडे वेळेवर पगार दिला जात नाही तर दुसरीकडे असे हाल होत असल्यानं जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे