Kalyan : दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर हल्ला, चेंकिंगसाठी थांबवल्यामुळे दगडानं मारहाण ABP Majha
Continues below advertisement
कल्याणमध्ये एका दुचाकीस्वारानं पोलिसाला दगडानं मारहाण केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी राहुल रोकडे या दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सुरु असताना वाहतूक पोलीस प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. यावेळी दुचाकीवरुन भरधाव वेगात येणाऱ्या राहुल कोकडे या तरुणाला पोलिसांनी थांबवलं. मात्र यावेळी या दुचाकीस्वारानं पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना दगडाने मारहाण केली. या घटनेत वाहतूक पोलीस प्रकाश पटाईत जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे..
Continues below advertisement
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Kalyan Mumbai Crime ABP Majha ABP Majha Video Traffic Police Attack