Kalyan : 8 कोटींची रोल्स रॉईस विकत घेणाऱ्या बिल्डरविरोधात वीजचोरीचा आरोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याण : कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी 8 कोटी रुपये किमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत महावितरणाने त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जवळपास 34 हजार 640 रुपयांची वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महावितरणाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रक्कम भरली असल्याचं महावितरणाकडून सांगण्यात आलं आहे. तर याप्रकरणी संजय गायकवाड यांनी मात्र हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी बोलताना माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जर वीजचोरी झाली असेल, तर मग मीटर का नेलं नाही? असा संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
संजय गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की, "वीजचोरी नसून तडजोडीचं बिल होतं, मीटरचा एक फेज जळाल्यानं महावितरणचे अधिकरी साईड व्हिजिट करण्यास आले होते. मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं, म्हणून महावितरणकडून तडजोडीचं बिल आकारण्यात आलं. परंतु, बिल आम्हाला मिळालं नव्हतं, माझी नाहक बदनामी केल्याप्रकरणी महावितरणाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे."