Raigad : एसटी चालकाचा अतिउत्साहपणा, प्रवासी धोक्यात
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. याचदरम्यान महाडमधून एसटी प्रवासाचा एक धोकादायक व्हीडिओ समोर आलाय. महाड ते विन्हेरे दरम्यान रेवतळे फाटा एसटी चालकाचा अतिउत्साहपणा समोर आलाय. पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असताना एसटी चालकाने बस याच पाण्यातून मार्ग काढत नेली. एसटी चालकाचा हाच अतिउत्साह प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा जीवघेणा प्रवास तुम्ही करु नका...