Justice Bhushan Dharmadhikari | भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालयाला नवे मुख्य न्यायमूर्ती मिळाले आहेत. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ दिली. या सोहळ्याला राजभवनात निवडक मान्यवरांची उपस्थिती होती. यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयातील काही न्यायमूर्ती, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, येत्या 27 एप्रिल रोजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे सेवानिवृत्त होणार आहेत.
Continues below advertisement