Coronavirus Effect | कसा टाळायचा कोरोना? पुणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Continues below advertisement
राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवण्येच आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर करोनाच्या भीतीने पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. एकीकडे सरकार आवाहन करतंय की गर्दी टाळा, घरीच थांबा. पण पुणे स्टेशन वर मात्र भयावह चित्र दिसत आहे. परंतु नागरिक मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या धास्तीनं महानगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज पुणे रेल्वस्टेशनवर नागरिकांनी तिकीट काढण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी केली पाहायला मिळाली. नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पुणे आणि पिंपरी या भागात करोनाचे 21 रुग्ण आढळले. पुण्यात बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांचीही संख्या जास्त आहे. पुण्याहून बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जाणाऱ्या रेल्वेवर प्रंचड गर्दी आहे. यामध्ये पुण्यात हॉटेलमध्ये, दुकांनमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. दुकानं बंद, त्यात कोरोनाची भीती यामुळे हे सगळे त्यांच्या गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. दुकान मालकाकडून कुठलीही रजा किंवा सुविधा त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे मिळेल गाडीने घरी जात आहेत. पुण्याहून बंगाल, उत्तर प्रदेश बिहारकडे जाणाऱ्या काही स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. पण तरीही गर्दी कमी होताना दिसत नाही आहे. पटण्याला जाणाऱ्या रात्री 9च्या गाडीसाठी दुपारी 12 वाजल्यापासून रांग आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram