Juhu Chowpatty | जुहू चौपाटीवर क्लिन-अप मार्शलची दादागिरी, फिरायला आलेल्या पर्यटकांना केली मारहाण
मुंबईत जागोजागी स्वच्छतेसाठी, नियमांचं पालन होत आहे ना हे पाहण्यासाठी नेमलेल्या क्लिन अप मार्शल्सच्या दिवसेंदिवस तक्रारी वाढताना दिसत आहेत. मुंबईतील जुहू चौपाटीवरील एक प्रकार सध्या समोर येतोय. मुंबईच्या जुहू चौपाटीवर फिरायला आलेल्या एका पर्यटकाला या क्लिनअप मार्शलने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मार्शलवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय.