Mumbai Jogeshwari Fire : 'OC नसताना Possession कसं?' जोगेश्वरीतील आगीनंतर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.

Continues below advertisement
मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) येथील JMM बिझनेस सेंटरला लागलेल्या भीषण आगीमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'ओसी नसताना तब्बल तेरा मजली असलेल्या या भव्य इमारतीमध्ये पझेशन कसं काय मिळालं?' असा सवाल उपस्थित केला जात आहे, ज्यामुळे प्रशासकीय हलगर्जीपणा उघड झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आली. इमारतीत अडकलेल्या सुमारे २६ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, काही जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला सातव्या मजल्यावर लागलेली ही आग दहाव्या मजल्यापर्यंत पसरली, ज्यात तीन मजल्यांचे मोठे नुकसान झाले. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (OC) नसतानाही त्यात गोदामे आणि दुकाने सुरू होती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन आणि सर्च ऑपरेशन सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola