Thackeray Reunion : ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? भाऊबीजेला भेटीची शक्यता
Continues below advertisement
राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य भेटीची चर्चा सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आई मधुवंती ठाकरे (Madhuvanti Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिल्यानंतर, आता भाऊबीजेच्या मुहूर्तावरही ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पुन्हा एकदा भाऊबीजेनिमित्तानं ठाकरे परिवार एकत्र येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्याकडे भाऊबीजेसाठी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांची बहीण उर्वशी ठाकरे असल्यामुळे यंदाची भाऊबीज शिवतीर्थवर साजरी होऊ शकते, ज्यामुळे राजकीय विश्लेषकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement