Jitendra Awhad on Kranti Redkar:जर इतिहास काढला तर लक्षात येईल हमाम में सब नंगे है :जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement

मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है। असा टोला आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांना लगावला. आज ठाण्यात उल्हासनगर पालिकेच्या 22 नगसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड बोलत होते. या कार्यक्रमात ओमी कलानी गट देखील राष्ट्रवादी पक्षात विलीन करण्यात आला. 

याबाबत अधिक बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, समीर वानखेडे यांनी 4 हजार प्रवाशी असलेल्या क्रूझवर धाड टाकली त्यावेळी त्यांना केवळ 6 जण ड्रग्ज घेतलेले मिळाले. बाकी 3 हजार 994 जण व्यवस्थित होते. असं कसं हा प्रश्न मला पडला आहे. जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेट बाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यात 90 हजार बोगस सर्टिफिकेटवर नोकरीला लागले आहेत. याचा अर्थ त्यांनी समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे मान्य केलं आहे. जर ते मान्य करत आहेत तर त्यावरून भाजपची भुमीका स्पष्ट होत आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो असं देखील आव्हाड म्हणाले.

आज जो पक्ष प्रवेश झाला यामध्ये उल्हासनगर पालिकेतील 40 पैकी 22 जणांनी प्रवेश केला. त्यामुळे पूर्ण पालिका आता राष्ट्रवादीच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. कारण यावेळी बोलताना आणखी 10 नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं म्हंटल आहे. शिवाय निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात येत असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई भाजपला करता येणार नाही. हे सर्व नगरसेवक ओमी कलानी गटाचे असले तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजप आता या नगरसेवकांवर काय कारवाई करणार अशी चर्चा होती. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई या नगरसेवकांवर होणार नाही, अशी माहिती समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा उल्हासनगरला गेली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची रात्री उशिरा भेट घेतली होती. त्यानंतरच ही सर्व सूत्र हलली असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram