Kirit Somaiya On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची अटक ही सेटिंग होती, किरीट सोमय्यांचा आरोप
Continues below advertisement
मुंबई : अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांना तात्काळ जामीनही मिळाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील तरुणाने केली होती. .दरम्यान, आज वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांची दहा हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली. मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याचं ट्वीट किरीट सोमय्यांनी केलं होतं. आज त्यांनी पुन्हा आव्हाडांवर आरोप केले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement