रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतली नव्हती : Jitendra Awhad PC

Phone Tapping : फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात दर दिवशी खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु असतानाच कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले असा दावाही त्यांनी केला.  

रश्मी शुक्ला यांच्याबाबत खळबळजनक दावा करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'कोणालाही फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त मुख्य गृह सचिवांची रितसर परवानगी लागते, रश्मी शुक्लांनी अमुक एका क्रमांकासाठी परवानगी घेतली होती का, या प्रश्नाचं उत्तर कुंटे यांनी नकारात्मक स्वरुपात दिलं. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची वाईट सवय होती, हा आरोप मागील सरकारपासूनच झालेलं आहे. ज्यावेळी त्यांनीत लिहिलेलं पत्र समोर आलं त्यावेळी त्यांनी जाऊन माफी मागितली होती. फोन टॅपिंग प्रकरणातच त्यांनी ही माफी मागितली होती. ज्यानंतर सरकारने सौम्य भूमिका घेतली'. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola