Jiah Khan suicide case: जिया खान मृत्यूप्रकरणात Sooraj Pancholi निर्दोष

Continues below advertisement

Jiah Khan suicide case: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची  (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभवी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.  

10 वर्षांच्या  प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणात निर्दोष घोषित केलं आहे. सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप  करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. पुराव्यांअभवी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram