Isha Ambani Anand Piramal in India : ईशा अंबानी-आनंद पिरामल जुळ्या बाळासह भारतात येणार

मुकेश अंबानी यांच्यी कन्या ईशा आणि आनंद पिरामल हे जोडपं जुळ्या बाळांसह अमेरिकेहून भारतात येणारेय. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात येणारेय. सकाळी ८.३० वाजता हे दोघेही व्हीआयपी गेट नंबर ८ वर पोहोचतील. कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानानं लॉस अँजलिसवरुन हे जोडपं मुंबईत येणारेय. अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असेल. बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ निवासस्थानावर देशभरातील १ हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल ३०० किलो सोनं दान करणार आहेत. तसेच, अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून ५ अनाथाश्रम सुरु केले जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील. बाळांसाठी आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी तयार करण्यात आलीय. बाळांसाठी जगप्रसिद्ध ब्रँडचे कपडे खास तयार करण्यात आलेत. त्याचप्रमाणे, बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या ८ नॅनी येणार आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola