Iqbal Singh Chahal on measles rubella or govar: लसीकरणासाठी धर्मगुरुंनी पुढाकार घ्यावा

Mumbai Measles Disease : मुंबईत (Mumbai) सध्या गोवर आजाराची ( Measles Disease) साथ पसरली आहे. केंद्र सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडून आज फैलाव वाढलेल्या विभागात आढावा आणि पाहाणी दौरा केला जाणार आहे.

मुंबईत गोवरचा विळखा वाढता

मुंबईला गोवर आजाराचा विळखा वाढतच आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 109 रुग्णांची नोद झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत 60 गोवरचे रुग्ण आढळले होते तर सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या 24 इतकी होती. तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गोवंडीमध्ये तीन बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरिय पथकं तैनात करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola