Iqbal Singh Chahal ED Inquiry : कोरोनाकाळात 100 कोटींचं कंत्राट,करार मात्र एक वर्षाने केल्याचा आरोप
Continues below advertisement
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या ईडी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याची चर्चा आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला एका वर्षासाठी 100 कोटींचं कंत्राट दिलं गेलं मात्र, त्याचा करार तब्बल एक वर्षानंतर केल्याची चर्चा आहे. करार न करता कंत्राट का दिलं?, असा सवाल ईडीच्या अधिकाऱ्यांनी चहल यांना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलीय. दरम्यान, या कंपनीला २७ जुलै २०२० रोजी कंत्राट दिलं आणि त्याचा करार मात्र ३० जून २०२१ रोजी केल्याबाबत ईडीने सवाल विचारल्याचं समजतंय.
Continues below advertisement