CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी आणि पालिका आयुक्तांनी केली स्वच्छता मोहिमेची पाहणी
Continues below advertisement
धूळ आणि वाढत्या प्रदूषणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलीए. महापालिकेनं पहाटे मुंबई द्रुतगती महामार्ग पाण्यानं स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं. पालिकेकडून रस्त्यावर पाणी फवारुन स्वच्छता मोहीम राबवण्यात आलीए. पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते. वांद्र्यातील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगर्ती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंनी स्वच्छतेची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी वांद्र्यातील कार्टर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतली
Continues below advertisement