Parel Terminus : मुंबईच्या परळ भागात उभारणार नवं टर्मिनस,CSMTवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेचा निर्णय

Continues below advertisement

मुंबईत परळ इथं नवं टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. सध्या या जागेत रेल्वेचं मोठं वर्कशॉप आहे. तेथील काही युनित माटुंगा कारशेडमध्ये हलवण्यात येणार आहेत. सीएसएटीवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. सीएसएमटीमधून दररोज ८८ लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा करतात. यामुळे तिथल्या यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. तसंच, दादर ते सीएसएमटी दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला तर या अनेक ट्रेन्स रद्द कराव्या लागतात. हे सगळं टाळण्यासाठी परळ टर्मिनस उभारण्यात येणार आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram