Raksha Bandhan 2020 | कंन्टेंन्मेंट झोनमध्येही राखी पोहोचणार; रक्षाबंधनासाठी पोस्टाची खास तयारी
यावर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनमधून जरी अनेक ठिकाणी शिथिलता मिळाली असली तरी जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पास आणि इतर अडचणी लक्षात घेऊन भाऊ-बहीण रक्षाबंधनासाठी पोस्टाचा जुना पॅटर्नचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. यावर्षी अनेक भावंडाना एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा करता येत नसल्याने पोस्टाने अनेक बहीणींनी आपली राखी भावापर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाऊसुद्धा पोस्टाने आपल्या बहिणीला गिफ्ट द्यायचा प्लॅन करत आहे. त्यामुळे पोस्टानेसुद्धा रक्षाबंधनासाठी विशेष तयारी केली आहे. अशी माहिती नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.