स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा : CM Uddhav Thackeray
महाराष्ट्रात उद्यापासून आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण निर्बंध शिथिल करतोय मात्र पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा. नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात लसीकरणाने वेग घेतलाय. काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. हा राज्यात लसीकरणाचा उच्चांक आहे. आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, असं ठाकरे म्हणाले.