Sharad Pawar ST Strike : विलिनीकरण शक्य नसल्यास पगारात वाढ करा, पवारांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती

Continues below advertisement

ST  Workers Strike updates : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता कमी होण्याची चिन्हं नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात यावा यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी या बैठकीत तोडगा सांगितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार, महामंडळाने हा तोडगा स्वीकारल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच ते 10 हजार रुपयांची वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram