Mumbai Metro: नव्या वर्षात मुंबईकरांना वेगवान प्रवासाचं गिफ्ट मिळणार ABP Majha
Continues below advertisement
मराठी नव्या वर्षात मुंबईकरांना गारेगार आणि वेगवान प्रवासाची भेट मिळणार आहे. मेट्रो२ अ आणि मेट्रो-७ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनाला गुढीपाडव्याचा मुहूर्त मिळालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ एप्रिलला या दोन्ही मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त एस.व्ही.एस श्रीनिवास यांनी दिलीय. हिल्या टप्प्यात 'मेट्रो २ अ' मार्गिकेवरील डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व आणि 'मेट्रो ७' मार्गिकेवरील आरे ते दहिसर पूर्व दरम्यानचा मार्ग खुला केला जाणार आहे. मेट्रो मार्गिकेची शेवटची चाचणी बुधवारी पूर्ण झाल्यावर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. आता सर्व अडथळे दूर झाले असून मुंबईतील दुसरी मेट्रो २ एप्रिलपासून धावणार आहे..
Continues below advertisement