Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांनी घेतला कार्यकर्त्यांसोबत बिर्याणीचा आस्वाद
मुंबई : मुस्लिम आरक्षण (Muslim reservation) आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून एमआयएम (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) आक्रमक झाले आहे. एमआयएमकडून आज औरंगाबाद-मुंबई रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही इम्तियाज जलील रॅली काढण्यावर ठाम आहेत. कार्यकर्त्यांच्या 300 गाड्या मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे. आज संध्याकाळी मुंबईत असदुद्दीन ओवेसींची सभा आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाही आहे. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे.
Tags :
Aurangabad Asaduddin Owaisi Aurangabad Police Imtiaz Jaleel MIM Mumbai Rally Aurangabad MIM Rally