Raj Thackeray on Farmer : मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे मदतीसाठी का येता?
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमधील शेतकरी संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली... यावेळी तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? असा सवाल राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला.. आता आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत असं आश्वासन यावेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना दिलं... त्यानंतर येत्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणणार असल्याचं आश्वासन राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले... तर परत दुसऱ्यांना मतदान केलं तर चाबकानेच मारेन अशी मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरेंनी शेतकऱ्याशी बोलताना दिली... यावेळी एकच हश्या पिकला..