'मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही, आत्महत्या थांबवा', राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एका मंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांसमोर ठेवली.