Nawab Malik : छापे वक्फ बोर्डावर नाहीत, एका ट्रस्टवर : नवाब मलिक
मुंबई : पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडलेले नाही. ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. ईडीच्या छापेमारीबाबत मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री नवाब मलिक म्हणाले, काही माध्यमांनी नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या खोट्या आहेत. ईडी माझ्या घरी आली तर त्यांचं मी स्वागत करेल. आमच्या क्लीनअप अभियानात ईडी सहभागी होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत आहे.