मागासवर्गीय असल्यानं मला त्रास दिला जातोय, Sameer Wankhede यांची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार
Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अशातच अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या प्रकरणी दररोज नवनवे दावे करत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच आहे, असं म्हटलं आहे.
Tags :
Drugs Nawab Malik NCB Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Cruise Drugs Case Kiran Gosavi Cruise Drugs Mumbai Drug Case Aryan Khan Drug Case Samir Wankhede Prabhakar Sail KP Gosavi Kiran Gosavi Arrested Kiran Gosavi News Mumbai Cruise Drug Case Witness Aryan Khan