Dombivali Road : डोंबिवलीच्या MIDC तील रस्त्यांची चाळण ! स्थानिक नागरिकांचा आक्रमक पवित्रा

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था गेल्या पाच ते सहा वर्षापासून कायम आहे.यंदाच्या पावसाळ्यात निवासी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सध्याच्या ऊन पावसाच्या खेळात खड्डयांबरोबरच धुळीचा त्रासही सहन करावा लागत आहे.खड्डे, माती, धूळ आणि खडी यातून मार्ग काढताना वाहनचालक आणि परिसरात राहणारे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहे. मध्यंतरी एमआयडीसी भागातील रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार असे होर्डीग्ज झळकविण्यात आले होते. मात्र अद्यापही रस्त्यांचे काम सुरू झालेलं नाही यंदाच्या पावसाळ्यात तर या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेले महापालिकेने रस्त्यातील खड्डे असल्याचा दावा केला असला तरी संथ गतीने ही कामे सुरू आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांचा त्रास मात्र आजही कायम आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola