Dhule : Male Female लघुपटाला Standalone Film Festival चा पुरस्कार, 23 वर्षीय भूषणचं मोठं यश
धुळे : धुळे शहरातील भूषण संजय पाटील या अवघ्या 23 वर्षांच्या तरुण युवकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेल्या 'मेल फिमेल' या 45 मिनिटांच्या लघु चित्रपटाला चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके जजेस पुरस्कार गेल्या महिन्यात जाहीर झाला. आता या चित्रपटाला स्टँड अलोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट प्रायोगिक चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. भूषण पाटील हा सध्या दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिक्षण घेत आहे.
धुळे शहरातील मूळचा रहिवासी असणारा आणि सध्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे पदवी शिक्षण घेत असलेल्या भूषणने लॉकडाऊनच्या काळात धुळे येथे एका हॉलमध्ये या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. शहरात उच्चशिक्षित तरुण बेरोजगारीने नैराश्य अवस्थेत तर पत्नी नोकरी करत घर संसार सांभाळून बेरोजगार नवऱ्यासाठी नोकरी शोधत फिरते. तर नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असतो. जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जात असताना देखील नवऱ्याला हिंमत आणि धीर देणारी पत्नी असे कथानक आहे.