पाय गमावलेल्या साक्षीला सव्वा लाखांची तातडीची मदत, महापौर पेडणेकरांनी रुग्णालयात घेतली साक्षीची भेट

मुंबई : रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकरला पायावर उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. दरड कोसळलेल्या घरातल्या बाळाला वाचवताना पाय गमावलेल्या क्रीडापटू साक्षी दाभेकरला कृत्रिम पाय मिळणार आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीनंतर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाकडून साक्षीचा पुढील उपचारासाठीचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. तसेच, कृत्रीम पाय बसवण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने घेतली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola