Mumbai : कोरोना नियमांचं मुंबईकरांकडून सर्रास उल्लंघन; दादरच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी
Continues below advertisement
मुंबई कोरोनामुक्त व्हावी यासाठी प्रशासनाकडून हरतऱ्हेचे प्रयत्न होतायत, मात्र दुसरीकडे कोरोना नियमांचं मुंबईकरांकडून सर्रास उल्लंघन होताना दिसतंय. मुंबईच्या दादर भाजी मार्केट मध्ये भाजी घेण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. खरं तर राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येतंय. मात्र दादरच्या भाजी मार्केट मध्ये आज सकाळी झालेली गर्दी नागरिकांची बेफिकीरी दाखवणारी आहे असंच म्हणावं लागेल.
Continues below advertisement