हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेऊ द्या कमाई होत नसताना लाईट बिलं,टॅक्स भरायला पैसा कुठून आणयचा?

Continues below advertisement

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार आहोत की राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे हटवा किंवा कडक निर्बंध लागू करा. टोपे यांच्या वक्तव्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. हॉटेल व्यवसायिकांचं म्हणणं आहे की आता आम्हांला 4 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. आमची मागणी आहे की राज्य सरकारने आता हॉटेल 10 वाजेपर्यत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. आमचा व्यवसाय प्रामुख्याने रात्री 7 नंतरच सुरू होतो. त्यामुळे याबाबत राज्य सरकार निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा. मागील दीड वर्षांत आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार देता आले नाहीत. लाईट बिलं भरमसाठ आली आहेत, टॅक्स सुद्धा भरावे लागले आहेत. त्यामुळे आता हा पैसा कुठून उभा करायचा हा प्रश्न आमच्या समोर आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram