Thane : डान्स बार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Continues below advertisement

मुंबई : कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधनं आहेत. डान्सबारवर बंदी असतानाही, ते राजरोसपणे सुरु आहेत. एबीपी माझाने ठाण्यातल्या 3 डान्सबारचा स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश केला. कोरोनाचे सगळे नियम धुडकावून इथे डान्सबार सुरु होता.

ठाण्यातल्या आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचा एबीपी माझाने पर्दाफाश केला आहे. कोरोनाचे नियम डाब्यावर बसवून हे तीनही बार दणक्यात सुरु होते. एखाद्या ठिकाणी असं सुरु असतं तर ठिके पण ठाण्यातील तीन बारमध्ये हे सर्व अनधिकृतपणे सुरु होतं. आता डान्सबार नुसते सुरु होते असं नाही तर डान्सबारमध्ये प्रवेशासाठी चक्क रांगा लागल्या होत्या. तेही रात्री. म्हणजे आपल्याकडे रात्री किराणा मिळणार नाही पण डान्सबारसाठी रांगा मात्र लागू शकतात.

अँटिक पॅलेस डान्सबारचं शटर बंद होतं पण मागच्या चोर दरवाजाने आत एन्ट्री मिळत होती. तिथल्या लोकांनी एपीबी माझाच्या प्रतिनिधींचे मास्क उतरवले, त्यांची माहिती घेतली. विश्वास बसल्यानंतर त्यांना आत सोडण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram