Dombivali Water Logging : कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार, नांदिवली येथे घरं, दुकानांमध्ये पाणी शिरलं
आज सकाळपासूनच कल्याण-डोंबिवली मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर कल्याण-डोंबिवलीत अधिकच वाढलाये त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील अनेक सखल परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य बाजार पेठ, शिवाजी चौक, आग्रा रोड येथे पाणी साचल्याने वाहतूक मंदावली तर आंबेडकर रोड येथे गुडघाभर पाणी साचले होते. शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या या परिसरात पाणी साचल्याने या ठिकाणी एकच वाहतूक कोंडी झाली होती तर कामानिमित्त ये-जा करणार्या नागरिकांचे देखील नागरिकांना देखील चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.