Mumbai Rains : तासाभरापासून मुंबईत मुसळधार पाऊस, वाहतूक संथ गतीनं, अनेक ठिकाणी पाणी साचलं
मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने उसंत घेतली होती.मात्र आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि आजू बाजूच्या परिसरात गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे.याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो आहे.घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर असल्फा मेट्रो स्थानक ते साकीनाका मेट्रो स्थानकच्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.रस्त्यावर या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी आहे.या मुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.