मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात, अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,बोरिवली, कांदिवलीत मुसळधार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jun 2021 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Rains : मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुबईला चांगलंच झोडपलं. मुंबईसह उपनगरांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाच्या कोसळधारांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, तसेच अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती. अशातच हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.