Vaitarna River Flood : वैतरणा नदीला पूर, मुसळधार पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडली, सतर्कतेचा इशारा
पालघरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्हातील मुख्य नद्या दुथडी भरुन वाहत असून वाडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैतरणा नदीने रौंद्र रुप धारण केलं आहे. पाण्याची पातळी बघता नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.