Maharashtra Rains Weather Alert : पुढील तीन तासात मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पाऊस
पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच चांगला पाऊस बघायला मिळत आहे. आज काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरे आणि ठाण्यासाठी वर्तवली होती. अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2-3 दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील 24 तासात कुलाब्यात 102 मिमी, सांताक्रुजमध्ये 31.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज सकाळी 8.30 पासून सांताक्रुजमध्ये आतापर्यंत 16.1 मिमी पावसाची नोंद, तर कुलाब्यात 13.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर देखील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.
Tags :
Konkan Maharashtra Rain Rain Updates Mumbai Rain Monsoon Update Weather Update Monsoon Rain In Maharashtra