
Temperature Update | मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा 40 अंशावर
Continues below advertisement
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. कोकणात सिधुदुर्ग, रत्नागिरी इथं उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तर, इथं मुंबईतही उन्हाळा जाणवू लागल्यामुळं नागरिक बेजार झाले आहेत. हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास 40 अंशांवर पोहोचला असून, पुढच्या काही तासांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील अनेक भागांमध्येही उन्हाचा तडाखा जाणवला.
Continues below advertisement