Marathi Bana | 'मराठी बाणा'वरुन अशोक हांडेंना तूर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
'मराठी बाणा' या शब्दांवरुन लोककलाकार अशोक हांडे आणि शेमारु कंपनीत सुरु असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने अशोक हांडेंना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसंच शेमारुने आपल्या नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' शब्द वापरण्यास हरकत नाही, असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे.